30 October 2020

News Flash

भारतीय टेबल टेनिसपटूंची धडाकेबाज कामगिरी, महिला-पुरुषांचा संघ उपांत्य फेरीत दाखल

महिला-पुरुष संघाची मलेशियावर ३-० ने मात

मनिका पात्राची आश्वासक खेळी

वेटलिफ्टर्स पाठोपाठ भारतीय बॅडमिंटनपटूंनी गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. महिला व परुषांचा संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. महिला व परुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या संघावर ३-० ने मात केली.

पुरुष संघातील हरमित देसाई आणि अचंता शरथ कमाल या खेळाडूंनी लागोपाठ दोन सामने जिंकत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर हरमित देसाई आणि सत्यन गणशेखरन यांनी दुहेरी सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीतली आपली जागा पक्की केली.

महिला संघातील मनिका बत्राने पहिल्याच सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर तीन सेटमध्ये सरळ मात करत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मधुरिका पाटकरला पहिल्या सेटमध्ये पराभवाचा धक्का बसला, मात्र यानंतर लागोपाठ सेटमध्ये विजय मिळवत मधुरिकाने आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मधुरिकाने मौमा दाससोबत दुहेरी सामन्यात मलेशियन जोडीवर मात करत उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चीत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:27 pm

Web Title: cwg 2018 indian paddlers beat malaysia to sail into the semifinals
Next Stories
1 तिसऱ्या पंचांची पाकिस्तानवर मेहरनजर, अखेरच्या सेकंदात गोल झळकावत पाकिस्तानकडून सामन्यात बरोबरी
2 वैद्यकीय सुविधा नाही, तरीही दुखापतीवर मात करुन सतिश शिवलिंगमची सुवर्णकामगिरी
3 राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताच्या पदकांचा भार वेटलिफ्टर्सवर, वेंकट राहुल रगालाने पटकावलं चौथं सुवर्णपदक
Just Now!
X