मीराबाई चानूने ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. ४८ किलो वजनी गटात वेटलिफ्टींग प्रकारात मीराबाई चानूने सुवर्णपदकाची कमाई केली. आज झालेल्या सामन्यांमध्ये मीराबाईने मिळालेल्या सहाही संधींचं सोनं करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मीराबाईने आज १९६ किलो वजन उचलत, राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या नावावर असलेला १९४ किलो वजनाचा विक्रम मोडला.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या! ४८ किलो वजनी गटात पटकावलं पदक

चार वर्षांपूर्वी ग्लास्गोत झालेल्या स्पर्धांमध्ये मीराबाईने रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र आज झालेल्या खेळांमध्ये मीराबाईने आपल्या गतवर्षीच्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. पहिल्या तीनही संधींमध्ये मीराबाईने ८०, ८४ आणि ८६ किलोचं वजन उचलत आपली दावेदारी प्रबळ केली. यानंतरच्या प्रयत्नांमध्ये मीराबाईने ४ किलो वजन वाढवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडत पदकावर आपलं नाव कोरलं.

या विजयानंतर सर्वच क्षेत्रातून मीराबाईचं कौतुक करण्यात येत आहे.