ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा प्रकारात भारताने पहिल्या दिवशी धडाकेबाज सुरुवात केली आहे. ५६ किलो वजनी गटात भारताच्या गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तीन प्रयत्नांमध्ये २४९ किलो वजन उचलत गुरुराजाने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये गुरुराजाला अपयश आलं, मात्र अखेरच्या प्रयत्नात गुरुराजाने जोरदार पुनरागमन करत १३८ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताचं खातं उघडलं, गुरुराजाला वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक

या प्रकारात मलेशियाच्या अझर अहमदने सुवर्ण तर श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने कांस्यपदकाची कमाई केली. २५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून तो कर्नाटक राज्याचा रहिवासी आहे. गुरुराजाचे वडिल ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्खितीमधून त्यांनी गुरुराजाला मोठं केलेलं आहे.

अवश्य वाचा – CWC 2018: सलामीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाची हाराकिरी