27 October 2020

News Flash

वैद्यकीय सुविधा नाही, तरीही दुखापतीवर मात करुन सतिश शिवलिंगमची सुवर्णकामगिरी

वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेक भारतीय खेळाडू नाराज

भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून देणारा सतिश शिवलिंगम

राष्ट्रकुल खेळांच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सनी पदक मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ७७ किलो वजनी गटात भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. सतिश कुमार शिवलिंगमने ३१७ किलो वजन उचलत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. भारताचं स्पर्धेतलं आतापर्यंतचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची पहिली ५ पदकं ही वेटलिफ्टींग प्रकारातूनच आलेली आहे. मीराबाई चानू, संजिता चानू आणि सतिश शिवलिंगमने सुवर्ण, गुरुराजाने रौप्य तर दिपक लाथेरने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक, वेटलिफ्टर सतिश शिवलिंगमची सुरेख कामगिरी

महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेदरम्यान सतिश शिवलिंगमला कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मदत मिळालेली नव्हती. स्पर्धेदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता, मात्र त्यावर मात करत सतिशने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केलीच. क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमांमुळे भारतीय चमूसोबत पुरेसे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यंदा ऑस्ट्रेलियाला जाऊ शकलेले नाहीयेत. अनेक खेळाडूंनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्पर्धा सुरु होण्यासाठी सतिश शिवलिंगमनेही याबद्दल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान सतिशने केलेल्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 8:24 am

Web Title: cwg games 2018 despite no medical facility available satish shivlingam fought hard and win gold for india
Next Stories
1 राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताच्या पदकांचा भार वेटलिफ्टर्सवर, वेंकट राहुल रगालाने पटकावलं चौथं सुवर्णपदक
2 आयपीएलच्या नव्या पर्वाला प्रारंभ
3 भारत-पाकिस्तान ‘हॉकी’युद्धाचा आज थरार
Just Now!
X