सायकलिंग म्हटले की पहिले नाव ओठांवर येते ते ‘टूर दी फ्रान्स’ या स्पर्धेचे. फ्रान्समध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता साऱ्या विश्वाला लागलेली असते. निसर्गाने नटलेला प्रदेश आणि त्यामधून घाटांच्या वळणावळणावर दिसणाऱ्या सायकलच्या रांगा, हे दृश्य बऱ्याच जणांवर मोहिनी घालते. या स्पर्धेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून या स्पर्धेच्या शताब्दीसाठी सारेज सज्ज झाले आहेत. एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे या स्पर्धेवर उत्तेजकांच्या प्रश्नांचे ढग असून या शनिवारपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे.
या स्पर्धेचा राजा समजला जाणारा लान्स आर्मस्ट्राँग गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य चाचणीत सापडला आणि या स्पर्धेवर मळभ आले. या प्रकरणाचे सावट यंदाच्या स्पर्धेवर असेल, असे म्हटले जात आहे. लान्सने १९९९ ते २००५ अशी सलग सात वर्षे ही स्पर्धा जिंकली होती. पण या वर्षी मात्र चुरस असेल ती गतविजेता ख्रिस फ्रुम आणि २००७ आणि २००९ साली विजेतेपद पटकावलेला स्पेनचा अल्बटरे कॉन्टाडोर यांच्यामध्ये. त्याचबरोबर या स्पध्रेचे तीन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या जर्मनीच्या जॅन उलरिच याच्यावर साऱ्यांची नजर असेल.

संघ : २२
सायकलपटू : १९८
टप्पे : २०
अंतर : ३४०३.३ किमी