News Flash

IPL २०२१ : ‘‘कदाचित वॉर्नरला आपण शेवटचं हैदराबादच्या जर्सीत पाहत आहोत”

बंद दाराआड काहीतरी घडत असल्याचं वेगवान गोलंदाजाचं मत

डेव्हिड वॉर्नर

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १४व्या सत्रात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात हैदराबादला ६ पराभव पाहावे लागले आहेत. डेव्हिड वॉर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर फ्रेंचायझीने केन विल्यमसनची कर्णधारपदी नेमणूक केली. वॉर्नरला कर्णधारपदापासून दूर करण्याव्यतिरिक्त फ्रेंचायझीने त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळले. हैदराबादला या सामन्यातही राजस्थानकडून ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

डेल स्टेनची प्रतिक्रिया

डेव्हि़ड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघामधील भविष्याविषयी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “हे विचित्र आहे, की तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पुढील सत्रासाठी कर्णधारपद बदलावे आणि केनला (विल्यमसन) तिथे ठेवावे अशी त्यांची भावना आहे. पण डेव्हिड अजूनही एक अभूतपूर्व फलंदाज आहे आणि मी अजूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवेन. पण ऑरेंज आर्मीमध्ये वॉर्नरला पाहिण्याची ही शेवटची वेळ असेल.”

२५ एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मनीष पांडेला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल वॉर्नरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर स्टेन म्हणाला, ”मनीषला बाहेर केल्यानंतर डेव्हिडने काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतील, मला माहीत नाही. कधीकधी, व्यवस्थापनाच्या या गोष्टीचे कौतुक होत नाही. संघाचा कर्णधार देखील काही निर्णय स्वत: घेऊ शकतो. असे दिसते, की बंद दाराच्या मागे काहीतरी नक्कीच घडत आहे, ज्याची जनतेला माहिती नाही.”

समालोचक सायमन डूल यांचे मत

आयपीएलच्या अनेक हंगामात समालोचन करणाऱ्या न्यूझीलंडच्या सायमन डूल यांनी वॉर्नरचे कर्णधारपद जाण्याबाबत एक महत्त्वाचे कारण सांगितले होते. डूल यांच्या म्हणण्यानुसार वॉर्नरचा टीम मॅनेजमेंटशी वाद होता आणि त्याचबरोबर मनीष पांडेबद्दलच्या टिपण्णीमुळे हा वाद आणखी वाढला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मनीष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. वॉर्नरने यावर प्रतिक्रिया दिली. ”मनीष पांडेला वगळण्याचा निवड समितीचा निर्णय होता. माझ्या मते हा अतिशय कठोर निर्णय होता, परंतु हा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला होता”, असे वॉर्नरने सांगितले. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान सायमन डूल म्हणाले, मनीष पांडेविषयी दिलेल्या याच विधानाचा वॉर्नरला फटका सहन करावा लागला.dale steyn feels that david warners days with sunrisers hyderabad may be coming to an end

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 4:27 pm

Web Title: dale steyn feels that david warners days with sunrisers hyderabad may be coming to an end adn 96
Next Stories
1 IPLवर करोनाचं सावट गडद; चेन्नईच्या टीममध्येही केला शिरकाव
2 IPL 2021: कोलकाताच्या खेळाडूंना करोनाची बाधा; आजचा सामना पुढे ढकलला
3 DC vs PBKS : मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा विजयी भांगडा!
Just Now!
X