News Flash

…आणि LIVE शोमध्ये स्टेन रडायला लागला!

भारतीय क्रिकेटपटूच्या प्रतिक्रियेनंतर स्टेन झाला भावूक

डेल स्टेन

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आदर्श मानते आणि त्या गोष्टीचा आपल्यासमोर उलगडा करते, तेव्हा आपण भावनिक होतो. असाच अनुभव दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेल स्टेनच्या बाबतीत आला. एका लाइव्ह कार्यक्रमात स्टेन रडायला लागला. या कार्यक्रमात त्याच्यासोबत आकाश चोप्राही होता.

या कार्यक्रमात स्टेन आणि चोप्रा हे क्रिकेटतज्ञ म्हणून आले होते. यात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या क्रिकेटप्रवासाचा उलगडा केला. यात त्याने स्टेन आपला आदर्श असल्याचे सांगितले.

मावी म्हणाला, ”क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून मी डेल स्टेनचे अनुसरण करीत आहे. जेव्हा मी गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा मी आउटस्विंग करण्यास सक्षम होतो. मी डेल स्टेनला पाहून गोलंदाजी कशी करावी, हे शिकण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या इतर गोलंदाजांकडूनही मी शिकण्याचा प्रयत्न केला. पण माझा आदर्श डेल स्टेनच राहिला आहे.”

मावीच्या प्रतिक्रियेनंतर डेल स्टेन भावूक झाला. तो म्हणाला, ”मावीच्या शब्दांमुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. जगातील निरनिराळ्या भागात राहणाऱ्या लोकांवर मी प्रभाव पाडेने, अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. क्रिकेट खेळ सुरू ठेवणे मला आवडते. शिवम मावीनेही अशीच कामगिरी केली तर, तो भारतीय संघाकडून नक्कीच खेळेल.”

शिवम मावीशी संपर्कात राहायला आवडेल असे स्टेनने सांगितले. ”ही एक चांगली भावना आहे. मावी आयपीएलमध्ये केकेआरसाठी मोठी भूमिका साकारणार आहे. मला त्याच्याशी संपर्क साधण्यास आवडेल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 3:39 pm

Web Title: dale steyn gets emotional in live show after listening to indian fast bowler adn 96
Next Stories
1 लोकांना बेड्स मिळत नसताना संघ मालक, कंपन्या, सरकार IPL वर एवढा पैसा कसा खर्च करु शकतात?; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा सवाल
2 ‘आयपीएल’वर भयसावट!
3 दिल्लीच्या घोडदौडीत बेंगळूरुचा अडथळा
Just Now!
X