News Flash

दामोदर करंडक क्रिकेट स्पर्धा: सिम्बायोसिस लॉ संघ विजेता

सिम्बायोसिस लॉ संघाने दामोदर करंडक आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. ऋषभ राठोडच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्यांनी अंतिम सामन्यात आबासाहेब गरवारे संघाचा नऊ गडी राखून

| March 14, 2013 03:46 am

सिम्बायोसिस लॉ संघाने दामोदर करंडक आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. ऋषभ राठोडच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्यांनी अंतिम सामन्यात आबासाहेब गरवारे संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.  
पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेने ही स्पर्धा आयोजित केली होती. प्रथम फलंदाजी करताना गरवारे संघाच्या फलंदाजांची राठोड (४/७)याच्या प्रभावी गोलंदाजीपुढे वाताहात झाली. त्यांचा डाव केवळ १०९ धावांमध्ये कोसळला. राठोड याला राहुल सवेरिया, दानिश शादाब व अभिमन्यू पाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत चांगली साथ दिली. गरवारे संघाकडून रिझवान पटेल याने ३४ धावा करीत एकाकी लढत दिली. राठोड याने शैलीदार फलंदाजी करीत नाबाद ६६ धावा टोलविल्या, त्यामुळे विजयासाठी असलेले ११० धावांचे आव्हान सिम्बायोसिस संघाने १८.३ षटकांत व एक गडय़ाच्या मोबदल्यात पार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:46 am

Web Title: damodhar cricket competiton symbiosis law team wins
Next Stories
1 युसेन बोल्ट सलग तिसऱ्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी
2 अमृतप्रित उपांत्य फेरीत
3 जार्विसने उडवली वेस्ट इंडिजची दैना
Just Now!
X