News Flash

कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत डॅनियल रिकाडरे विजेता

रेड बुल संघाच्या डॅनियल रिकाडरे याने मर्सिडीज संघाची मक्तेदारी संपवत येथे झालेल्या कॅनेडीयन ग्रां.प्रि. मोटार शर्यतीत विजेतेपद पटकावले. त्याने शेवटच्या टप्प्यात मालिकेतील आघाडीवीर निको रोसबर्ग

| June 10, 2014 12:39 pm

रेड बुल संघाच्या डॅनियल रिकाडरे याने मर्सिडीज संघाची मक्तेदारी संपवत येथे झालेल्या कॅनेडीयन ग्रां.प्रि. मोटार शर्यतीत विजेतेपद पटकावले. त्याने शेवटच्या टप्प्यात मालिकेतील आघाडीवीर निको रोसबर्ग याला मागे टाकले आणि हे संस्मरणीय यश खेचून आणले.
लुइस हॅमिल्टन याची मोटार नादुरुस्त झाल्यामुळे त्याला शर्यतीतून माघार घ्यावी लागली. रोसबर्ग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत त्याच्या मोटारीत काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता मात्र त्याने ही समस्या दूर करीत पुन्हा शर्यतीत भाग घेतला. रेड बुल संघाचा चार वेळा विजेतेपद मिळविणारा खेळाडू सेबॅस्टीयन व्हेटेल याला तिसरे स्थान मिळाले.  
या शर्यतीमधील शेवटची फेरी बाकी असताना फोर्स इंडियाचा सर्जी पेरेझ व विल्यम्स संघाचा फेलिपे मासा यांची जोरदार धडक झाली. ताशी २४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गाडी चालविताना दोन्ही स्पर्धकांनी अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात झाला. दोन्ही मोटारींचे खूप नुकसान झाले मात्र स्पर्धकांना फारशी मोठी दुखापत झाली नाही.
इंग्लंडच्या जेन्सन बटन याने चौथा क्रमांक मिळविला तर फोर्स इंडियाचा आणखी एक स्पर्धक निको हुल्केनबर्ग याने पाचवे स्थान पटकाविले. दोन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या फर्नान्डो अलोन्सो या स्पॅनिश स्पर्धकास सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या शर्यतींच्या मालिकेत रोसबर्गने हॅमिल्टनपेक्षा २२ गुणांनी आघाडी मिळविली आहे.

नेदरलँड्स, अर्जेटिना उपांत्य फेरीत
नेदरलँड्स व अर्जेन्टिना यांनी साखळी ‘ब’ गटात अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळवित उपांत्य फेरी गाठली. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा ७-१ असा दणदणीत पराभव केला. अर्जेटिनाने आशियाई विजेत्या दक्षिण कोरियावर ५-० असा मोठा विजय मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2014 12:39 pm

Web Title: daniel ricciardo wins formula 1 canadian grand prix
Next Stories
1 रोनाल्डोच्या पुनरागमनाने पोर्तुगालमध्ये उत्साह
2 क्रमवारीत सानिया सहाव्या स्थानावर
3 विल्यमसनचे नाबाद शतक
Just Now!
X