News Flash

कुत्रा चावल्यामुळे खेळाडूची सामन्यातून माघार

खेळाडूच्या तळहाताला दुखापत

संग्रहीत छायाचित्र

आतापर्यंत क्रिकेटमध्ये खेळाडूंनी अनेकदा माघार घेतल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. कित्येकदा दुखापतीमुळे तर कधी वैय्यक्तिक कारणांमुळे खेळाडू सामन्यातून माघार घेतात. मात्र ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट सामन्यात Western Australia संघाचा खेळाडू डार्सी शॉर्टला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे, घरातल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे शाॉर्टला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.

घरात शॉर्ट आपल्या कुत्र्याशी खेळत असताना हा अपघात घडल्याचं समजतं आहे. यावेळी कुत्र्याने शॉर्टच्या तळहाताला चावा घेतल्याचं समजतंय, त्यामुळे शॉर्ट सध्या काही दिवसांसाठी क्रिकेट खेळू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. शॉर्टसोबत मार्कस स्टॉयनिस आणि मॅट केली हे खेळाडूही सामना खेळू शकणान नसल्यामुळे Western Australia संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात Western Australia संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:10 pm

Web Title: darcy short injured after being bitten by his own dog
Next Stories
1 Asia Cup 2018 : विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय चुकीचा – संदीप पाटील
2 Asia Cup 2018 : संजय मांजरेकरांच्या मते पाकिस्तानला विजेतेपदाची सर्वाधिक संधी
3 भारत-पाक सामन्यात कोहलीच्या अनुपस्थितीचा परिणाम होणार नाही- सौरव गांगुली