08 April 2020

News Flash

विंडीजचा माजी कर्णधार पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत

पाक राष्ट्रपती कार्यालयात केला अर्ज

वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेतील पेशावर झलमी संघाच्या मालकांनी सॅमीचा अर्ज पाक राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे. सॅमी पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत पेशावर संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

“डॅरेन सॅमीला पाकिस्तानचं नागरिकत्व मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या पाक राष्ट्रपतींच्या कार्यालयात हा अर्ज पोहचलेला आहे. पाक क्रिकेट बोर्डाकडून यासाठी शिफारसीची गरज लागणार आहे, यासाठी मी विनंतीही केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांकडून शिफारस आल्यानंतर सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो”, पेशावर संघाचे मालक जावेद आफ्रिदी स्थानिक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामांमध्ये सॅमीने सहभाग घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झाल्यानंतर सॅमीनेही आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 8:05 am

Web Title: darren sammy applies for pakistan citizenship application forwarded to president by peshawar zalmi owner psd 91
Next Stories
1 न्यूझीलंडच्या माजी खेळाडूकडून स्मृती मंधानाची विराट कोहलीशी तुलना
2 Ind vs NZ : अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
3 पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर मात, अ‍ॅश्टन अ‍ॅगरची हॅटट्रीक
Just Now!
X