News Flash

मालदीवमध्ये मद्यधुंद अवस्थेत वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात मारामारी?

IPLच्या स्थगितीनंतर मालदीवला थांबलेत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू

डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर

स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरशी मद्यधुंद अवस्थेत झालेल्या भांडणाच्या वृत्ताला क्रिकेटपटू-समालोचक मायकेल स्लेटर यांनी नाकारले आहे. आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मालदीव येथे थांबले आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांना १५ मेपर्यंत बंदी घातल्यामुळे हे क्रिकेटपटू मालदीवला थांबले. यादरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्यात ताज कोरल रिसॉर्ट येथे मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत झडप झाल्याचे वृत्त डेली टेलिग्राफने दिले होते.

मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्लेटर यांनी सांगितले. ते म्हणाले, “या वृत्तांमध्ये काहीही ठोस नाही. वॉर्नर आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि आमच्यात भांडणाची शक्यता शून्य आहे.” वॉर्नर म्हणाला, “काहीही झालेले नाही. आपल्याला या प्रकारच्या गोष्टी कुठून मिळतात हे माहीत नाही. आपण येथे नसल्याशिवाय आपण काहीही लिहू शकत नाही आणि आपल्याला कोणतेही ठोस पुरावे मिळणार नाहीत. असे काही घडलेच नाही.”

वॉर्नर आणि स्लेटर हे ३९ ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या संघाचा एक भाग आहेत. त्यांना गुरुवारी चार्टर्ड विमानाने मालदीव येथे आणले गेले. आयपीएलमध्ये समालोचन करणारे स्लेटर इतर लोकांपूर्वीच मालदीवला गेले होते.

 

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:35 pm

Web Title: david warner and michael slater deny news of hotel brawl in maldives adn 96
Next Stories
1 “करोनाच्या परिस्थितीत भारतात IPL सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य”
2 धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा
3 फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलची करोनाविरुद्धच्या लढ्यात उडी, दिली ‘इतकी’ देणगी
Just Now!
X