आयपीएल २०२१मध्ये सामील झालेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आज सोमवारी घरी पोहोचले आहे. मालदीवहून सिडनीला पोहोचल्यानंतर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. शिवाय, ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर १५ दिवसाची बंदी घातल्याने बहुतेक परदेशी खेळाडू मालदीवमध्ये पोहोचले होते.

आयपीएलमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसी सोमवारी संध्याकाळी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. हसी कतारमार्गे सिडनीला पोहोचेल. ६ मेला तो रोजी मालदीवमध्ये दाखल झाला होता आणि तेथे तो क्वारंटाइनमध्ये होता.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.