ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या शीला की जवानी या गाण्यावर त्याने लेकीसोबत डान्स केला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला होता. दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन आणि ज्युनियर NTR या दोघांच्या प्रसिद्ध गाण्यावर वॉर्नर पती-पत्नीने ताल धरला होता. पण आता मात्र वॉर्नर प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.
‘ये जो तेरे पायलों की छनछन है’ या लोकप्रिय गाण्याची आणि त्याही पेक्षा महत्वाचे त्या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका जोडप्याची वॉर्नर दाम्पत्याला भुरळ पडली आहे. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गाण्यावर एक जोडपं शेतातील पायवाटेजवळ झकास डान्स करताना दिसत आहे. तो व्हिडिओ वॉर्नरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्या व्हिडिओतील अर्ध्या भागात वॉर्नर पती-पत्नी हा डान्स पाहण्याचा आनंद घेत आहेत. इतकेच नव्हे तर ‘हा डान्स खूपच सुंदर आहे. मला डान्स खूप आवडला’, असं कॅप्शनदेखील वॉर्नरने त्या व्हिडीओखाली दिले आहे.
दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या एका चित्रपटातील बुट्टाबोम्मा या गाण्यावर डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी यांनी रोमँटिक डान्स केला. अल्लू अर्जुनने स्वतः याबद्दल वॉर्नरला धन्यवाद दिले होते. त्यानंतर अभिनेता ज्युनियर NTR याच्या गाण्यावरही श्री व सौ वॉर्नर यांनी ताल धरला होता. पक्का लोकल या गाण्यावर त्या दोघांनी डान्स केला होता. हे सगळे व्हिडीओ वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 1:08 pm