News Flash

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये ४ हजार धावा करणारा पहिला विदेशी खेळाडू

आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला

चार हजारी पल्ला गाठणारा वॉर्नर हा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट आयपीएलमध्ये चांगलीच तळपते. यंदाच्या पर्वातही वॉर्नर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या एलिमनेटर सामन्यात वॉर्नरने ३७ धावा करून आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. खरंतर वॉर्नर आधीच रोहित शर्मा, गौतम गंभीर यांनी चार हजार धावांचा टप्पा पार केला आहे. पण हा पल्ला गाठणारा वॉर्नर हा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे.

वॉर्नरच्या खात्यात यंदाच्या पर्वात ६०० हून अधिक धावा जमा आहेत. वॉर्नरच्या आक्रमक खेळीच्या जोरावर हैदराबादने आजवर अनेक सामने जिंकले आहेत. एकूण १४ सामन्यांमधील ८ सामने जिंकून हैदराबादला गुणतालिकेत तिसरे स्थान मिळाले. आयपीएलमधील सर्वात प्रभावी खेळांडूमध्येही वॉर्नर अव्वल स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 10:47 pm

Web Title: david warner brings up 4000 runs in ipl
Next Stories
1 धोनीच्या नावावर असाही विक्रम..
2 IPL2017 : कोलकात्याचा हैदराबादवर ७ विकेट्सने विजय, आता गाठ मुंबईशी
3 IPL 2017 : आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
Just Now!
X