फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’; मार्नस लाबूशेन ठरला ‘हिरो’

या सामन्याच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरने एका कारणावरून पंचांशी हुज्जत घातली. ऑस्ट्रेलियाच्या १ बाद २०७ धावा झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्नर आणि लाबूशेन दोघे धाव घेताना खेळपट्टीच्या मधून धावले. पंचांनी वारंवार बजावूनही तीच चूक केल्यामुळे पंचांनी संघाच्या धावसंख्येतून पाच धावा वजा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वॉर्नरला फारसा पटला नव्हता, त्यामुळे त्याने पंचांशी हुज्जत घातली. पण त्यानंतर मात्र खेळ पुन्हा सुरू झाला.

असा रंगला कसोटी सामना –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावांची मजल मारल्यानंतर लायनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. लायनने ६८ धावांमध्ये पाच बळी मिळवले. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही दमदार खेळी केली. वॉर्नरच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद २१७ धावांवर डाव घोषित केला.

रॉस टेलरचा धमाकेदार विक्रम; फ्लेमिंगला टाकलं मागे

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. टॉम ब्लंडेल(२), टॉम लॅथम(१), जीत रावल(१२), फिलिप्स (०) आणि रॉस टेलर (२२) हे पाच फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ३८ झाली होती. त्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने दमदार अर्धशतक लगावत काही काळ संघर्ष केला. पण तोदेखील ५२ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचे ९ गडी १३६ धावांत बाद झाले. तर गडी दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. दमदार द्विशतक (२१५) लगावणारा मार्नस लाबूशेन सामनावीर आणि मालिकावीर ठरला.