13 December 2018

News Flash

डी’कॉककडून माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी!

कुटुंबाच्या समर्थनार्थ मी नेहमी उभा राहीन

वॉर्नरचा आरोप

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी’कॉकने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने केला. कुटुंबाच्या समर्थनार्थ मी नेहमी उभा राहीन, असे वॉर्नरने सांगितले.

दरबानच्या पहिल्या कसोटी सामन्यात वाद घालणाऱ्या दोन्ही खेळाडूंना आयसीसीकडून बुधवारी दंड ठोठावण्यात आला आहे. वॉर्नरच्या मानधनाच्या ७५ टक्के आणि डी’कॉकच्या २५ टक्के दंड करण्यात आला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळायला दोन्ही खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. वॉर्नरला तीन गैरवर्तनाचे गुण देण्यात आले आहेत. यात आणखी एक गुण जमा झाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

डी’कॉकने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या, असा आरोप वॉर्नरने केला आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांसमोर वॉर्नर म्हणाला, ‘‘मी कदाचित माझ्या रागावरील नियंत्रण गमावले. मी व्हिडीओ चित्रण पाहिले आणि माझ्या वागण्याची मला खंत वाटली. मी भावनिकदृष्टय़ा वागलो. परंतु माझ्या कुटुंबाचे मी नेहमीच समर्थन करीन. कुटुंब, वर्णभेद किंवा तत्सम गोष्टी कुणीच सहन करणार नाही.’’

First Published on March 9, 2018 1:53 am

Web Title: david warner opens up on quinton de kock