करोना विषाणूची दहशत सध्या सर्वत्र दिसून येत आहे. सर्व क्षेत्रातील कामं ठप्प आहेत. क्रीडाविश्वही त्रस्त आहे. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरी आहेत. घरबसल्या क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सध्या टिकटॉकवर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. तो गेले काही दिवस सातत्याने टिक टॉकवर व्हिडीओ बनवत असून तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करतो आहे. आजदेखील त्याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये वॉर्नर, त्याची पत्नी आणि दोन मुली एक शर्यत खेळत आहेत. तिघांच्या हातात कारच्या स्टेअरिंग व्हीलप्रमाणे डब्ब्यांची झाकणं आहेत, तर एक मुलगी थेट लोळत शर्यतीत सहभागी झाली आहे. या शर्यतीत कोण जिंकलं? असा प्रश्न वॉर्नरने चाहत्यांना विचारला आहे.
“फक्त पाच सामने खेळलेल्या क्रिकेटरला भारताच्या वर्ल्ड कप संघात कसं काय निवडता?”
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
Who wins the race?? @candywarner1 one for the kids!! Indi favourite #mariochallenge #family
“गांगुलीला भडकवणं अगदी सोपं”; रसल अरनॉल्डने सांगितला भांडणाचा किस्सा
वॉर्नरने सर्वप्रथम शीला की जवानी गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर त्याने सहकुटुंब एका म्यूझीकवर डान्स केला होता. त्यानंतर त्याने अल्लू अर्जूनच्या गाण्यावर डान्स केला. हे सारे टिकटॉक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानंतर वॉर्नरने आणखी व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने आपली पत्नी कँडी आणि मुलगी यांच्यासोबत विरासत या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या म्यूझीकवर डान्स केला. त्याने त्या व्हिडीओमध्ये केवळ हातवाऱ्यांच्या सहाय्याने डान्स केला असून तिघांनीही एकत्रितपणे सारखे हावभाव केल्याने व्हिडीओत धमाल आली. चाहत्यांचाही यास चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्याने एका व्हिडीओत चहाचा घोट घेत विचित्र हावभाव करतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता.
ICC च्या ट्विटवर सचिन, गांगुलीचा अफलातून रिप्लाय
तर दोन-तीन दिवसांपूर्वी त्याने वेगळाच व्हिडीओ पोस्ट केला होता. अल्लू अर्जूनच्या गाण्यानंतर त्याने दक्षिण भारतातील चाहत्यांना आकर्षित करेल असा आणखी एक टिकटॉक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात त्याने एक डायलॉग म्हटला. तो डायलॉग कोणत्या चित्रपटाचा आहे हे त्याने चाहत्यांना ओळखायला सांगितलं होतं. महत्ताची बाब म्हणजे त्याने कॅप्शनमध्ये चित्रपट ‘टॉलिवूड’चा म्हणजेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला असल्याची ‘हिंट’ दिली होती. वॉर्नर IPL मध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार असल्याने दक्षिण भारतातून त्याच्या व्हिडीओला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 5:26 pm