News Flash

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, वॉर्नरसह हुकुमी एक्के संघात परतले

मेलबर्न कसोटीत टीम इंडियाची कांगारुंवर मात

मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत पुकोव्सकी यांना संघात स्थान दिलं आहे.

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ –

टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), सिन अबॉट, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवूड, मार्कस हॅरीस, ट्रॅविस हेड, मोईजस हेन्रिकेज, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपन्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर

आणखी वाचा- सिडनी कसोटीसाठी रोहितचा भारतीय संघात सहभाग निश्चीत नाही, शास्त्री गुरुजींचे सूचक संकेत

दरम्यान मेलबर्न कसोटी पराभवानंतर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटींगने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर खराब प्रदर्शन केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना गेला होता. पहिल्या कसोटीत ३६ धावांवर बाद होणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार मुसंडी मारल्याचे पाँटिंग म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:52 pm

Web Title: david warner return to squad for last 2 test against india psd 91
Next Stories
1 “भारतानं ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारलं”; रावळपिंडी एक्सप्रेसने अजिंक्यचंही केलं कौतुक
2 बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव
3 सर जाडेजानं रचला इतिहास; धोनी-कोहलीच्या खास पंगतीत मिळालं स्थान
Just Now!
X