News Flash

दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिकेतून बाहेर

दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान फिल्डींगदरम्यान वॉर्नरच्या मांडीचा स्नायू दुखावला

वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये धडाकेबाज अर्धशतकी खेळी करुन संघाला चांगली सुरुवात करुन देणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाहीये. दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता.

यानंतर डेव्हिड वॉर्नरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यात त्याच्या मांडीचा स्नायू दुखावल्याचं समोर आलं आहे. वॉर्नर संघाबाहेर गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाने डार्सी शॉर्टला टी-२० संघात जागा दिली आहे.

भारताविरुद्ध पहिल्या दोन वन-डे सामन्यांदरम्यान वॉर्नरने धडाकेबाज खेळी केली होती. पहिल्या सामन्यात ६९ तर दुसऱ्या सामन्यात वॉर्नरने ८३ धावांची खेळी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 8:45 am

Web Title: david warner ruled out of final odi and t20i series against india psd 91
Next Stories
1 SA vs ENG : इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, मालिकाही जिंकली
2 करोना लशीसाठी ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना प्राधान्य -रिजिजू
3 ला-लीगा फुटबॉल: बार्सिलोनाचा विजय; रेयाल माद्रिदचा मात्र पराभव
Just Now!
X