18 January 2021

News Flash

डायलॉगवरून चित्रपट ओळखा… वॉर्नरचं चाहत्यांना ‘चॅलेंज’

पाहा तुम्हाला ओळखता येतोय का चित्रपट?

सध्या बहुतांश देशांना करोना विषाणूचा फटका बसला आहे. सर्व क्षेत्रातील कामं ठप्प आहेत. क्रीडा विश्वही त्यातून सुटलेलं नाही. जवळपास सगळ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरी आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून साऱ्यांचे आणि विशेषत: भारतीयांचे लक्ष वेधून घेत आहे.

ना विराट, ना रोहित… हा फलंदाज सर्वात धडाकेबाज – जोफ्रा आर्चर

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या ‘शीला की जवानी’ या प्रसिद्ध गाण्यावर वॉर्नरने लेकीसोबत डान्स केला होता. टिकटॉकचा तो व्हिडीओ त्याने इस्टाग्रामवर शेअर केला होता. दुसऱ्या वेळी ‘साऊथ स्टार’ अल्लू अर्जूनच्या गाण्यावर ही ‘श्री व सौ वॉर्नर’ थिरकताना दिसले होते. आता वॉर्नरने भारतीयांना आणि विशेषत: दक्षिण भारतीयांना आकर्षित करण्याचा चंग बांधलेला आहे. अल्लू अर्जूनच्या गाण्यानंतर आता त्याने आणखी एक टिकटॉक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्याने एक डायलॉग म्हटला आहे. तो डायलॉग कोणत्या चित्रपटाचा आहे हे त्याने चाहत्यांना ओळखायला सांगितलं आहे. महत्ताची बाब म्हणजे त्याने कॅप्शनमध्ये चित्रपट ‘टॉलिवूड’चा म्हणजेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला असल्याची ‘हिंट’ दिली आहे.

“एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन, कारण…”

पाहा वॉर्नरचा धमाकेदार व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Guess the movie?? I tried everyone Good luck #tollywood #requested #helpme #

A post shared by David Warner (@davidwarner31) on

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर; समालोचकाने जाहीर केला संघ

सर्वप्रथम वॉर्नरने शीला की जवानी गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर त्याने सहकुटुंब एका म्यूझीकवर डान्स केला होता. त्यानंतर त्याने अल्लू अर्जूनच्या गाण्यावर डान्स केला. हे सारे टिकटॉक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानंतर वॉर्नरने आणखी व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने आपली पत्नी कँडी आणि मुलगी यांच्यासोबत विरासत या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या म्यूझीकवर डान्स केला. त्याने त्या व्हिडीओमध्ये केवळ हातवाऱ्यांच्या सहाय्याने डान्स केला असून तिघांनीही एकत्रितपणे सारखे हावभाव केल्याने व्हिडीओत धमाल आली. चाहत्यांचाही यास चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्याने एका व्हिडीओत चहाचा घोट घेत विचित्र हावभाव करतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:48 pm

Web Title: david warner tik tok video guess movie by listening dialogues tollywood indian movie fan challenge vjb 91
Next Stories
1 विरेंद्र सेहवाग खोटारडा माणूस आहे – शोएब अख्तर
2 ना विराट, ना रोहित… हा फलंदाज सर्वात धडाकेबाज – जोफ्रा आर्चर
3 “एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन, कारण…”
Just Now!
X