News Flash

पन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच मैदान गाजवण्यास सज्ज

दोषी ठरवल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच डेव्हिड वॉर्नर क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

डेव्हिड वॉर्नर

 

बॉल टॅम्परिंग प्रकरणाला दोन महिने  पुर्ण होत नाही तोच, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पन्हा एकदा मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोषी ठरवले आहे. तसेच त्यावर एक वर्षांची बंदी घातली आहे.

दोषी ठरवल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट खेळताना दिसणार आहे. वॉर्नरला एक वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात बंदी घातली असली तरी, तो  क्लब क्रिकेट खेळू शकणार आहे. तो वॉर्नर सिडनीतील रेंडविक पीटरशॅम या क्लबमधून क्रिकेटमध्या पुनरागमन करताना दिसेल.

रेंडविक पीटरशॅम माईक व्हाइटनी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला असे सांगितले की, “डेव्हिड वॉर्नर आमच्या क्लबमधून खेळतो आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती आमच्यासाठी मनोबल उंचवणारी ठरणार आहे. वॉर्नर आमच्या क्लबसाठी किमान तीन सामने तरी खेळणार आहे.”

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. पण स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर एखाद्या वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नरला २०१६ मध्येही पंचांनी ताकीद दिली होती. शेफिल्ड शिल्ड २०१६ दरम्यान ही ताकीद देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:21 pm

Web Title: david warner will play cricket match soon
Next Stories
1 झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी लालचंद राजपूत
2 बीसीसीआयने कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं – गौतम गंभीर
3 कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होणार? आयसीसीकडून बदलांचे संकेत
Just Now!
X