14 December 2017

News Flash

सिंग इज किंग! जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देवेंद्र सिंहची ऐतिहासिक कामगिरी

भालाफेक प्रकारात गाठली अंतिम फेरी

ऑनलाइन टीम | Updated: August 11, 2017 7:45 PM

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी भालाफेक प्रकारात देवेंद्र सिंहने ऐतिहासिक कामगिरी केली.  भालाफेक प्रकारात भरवशाचा खेळाडू नीरज पांडेचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर देवेंद्र सिंहने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भालाफेकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा देवेंद्र सिंह पहिला भारतीय ठरला आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात ८२.२२ मीटर, दुसऱ्यांदा ८२.१४ मीटर तर तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात सर्वाधिक ८४.२२ मीटर भाला फेकला. या कामगिरीमुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  नीरज चोप्राच्या निराशजनक कामगिरीनंतर दवेंद्रने भारतीयांना दिलासा दिला. नीरज चोप्रा  पात्रता फेरीतच बाद झाला. त्याला या स्पर्धेत ८२.२६ मीटर भाला फेकता आला. त्यामुळे तो पंधराव्या स्थानावर फेकला गेला.

अंतिम फेरीतील प्रवेशानंतर देशाला पदक मिळवून देण्याची इच्छा देवेंद्रने व्यक्त केली. तो म्हणाला की, नीरजचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर स्पर्धेतील माझी जबाबदारी वाढली आहे. मला देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने जो पराक्रम  केलेला नाही तो पराक्रम करण्यास मी उत्सुक आहे. खांद्याच्या दुखापतीतून चिंता करण्याची गरज नसून अंतिम सामन्यात भारताला पदक मिळवून देण्यासाठी मैदानात उतरेल, असा विश्वास देवेंद्रने व्यक्त केला.

First Published on August 11, 2017 7:23 pm

Web Title: davinder singh becomes 1st indian to qualify for javelin finals neeraj chopra out