News Flash

डेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला

खेळाडूंच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय टेनिस संघटननेने (आयटा) डेव्हिस चषकातील चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’ लढतीसाठी दिल्लीची निवड केली आहे.

| July 30, 2015 12:41 pm

खेळाडूंच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय टेनिस संघटननेने (आयटा) डेव्हिस चषकातील चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’ लढतीसाठी दिल्लीची निवड केली आहे. १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत ही लढत रंगणार आहे. या लढतीसाठी दिल्ली आणि पुणे यांच्यात आयोजनासाठी चुरस होती. मात्र बहुतांशी खेळाडूंनी दिल्लीला प्राधान्य दिल्याने राजधानीला आयोजनाची पसंती मिळाली.
दिल्लीतील आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये या लढती होणार आहेत. पुण्यात वातावरण उष्ण असते आणि आद्र्रताही जास्त असते. ही परिस्थिती चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंना अनुकूल होईल. भारतीय खेळाडूंना नाही. त्यामुळे पुण्याऐवजी दिल्लीला प्राधान्य देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीच्या खन्ना स्टेडियमधील संथ कोर्टवर सोमदेवने एकही लढत गमावलेली नाही. आयटाचे अध्यक्ष अनिल खन्ना, महासचिव भरत ओझा आणि बंगाल टेनिस संघटनेचे अध्यक्ष हिरॉनमय चटर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:41 pm

Web Title: davis cup match in new delhi
Next Stories
1 बार्सिलोनाचा दारुण पराभव
2 टेनिस : साकेत मायनेनीला पराभवाचा धक्का
3 भारत ‘अ’ संघाची घसरगुंडी
Just Now!
X