News Flash

 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : स्पेनची सहाव्या विजेतेपदावर मोहोर

३३ वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

नदाल आणि बॉटिस्टा यांच्या दमदार कामगिरीमुळे कॅनडावर २-० अशी मात

राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला रविवारी सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० असा पराभव केला.

अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा ७-६ (७/३), ६-३ असा पराभव करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला ६-३, ७-६ (९/७) असे पराभूत केले. हे वर्ष संस्मरणीय केल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे नदालने सामन्यानंतर सांगितले. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षागृहात स्पेनचे राजे सहावे फेलिप, रेयाल माद्रिदचा सर्जिओ रामोस, बार्सिलोना गेरार्ड पिक्यू आदी उपस्थित होते.

३३ वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे डेव्हिस विजेतेपदाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

६स्पेनने डेव्हिस चषक स्पर्धेत २०००, २००४, २००८, २००९, २०११, २०१९ अशी सहा जेतेपदे पटकावली आहेत.

४-१  नदालने स्पेनच्या चार (२००४, २००९, २०११, २०१९) डेव्हिस चषक विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर रॉजर फेडररने स्वित्र्झलडला फक्त २०१४ मध्ये एकमेव डेव्हिस चषक जिंकून दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:25 am

Web Title: davis cup tennis tournament akp 94 4
Next Stories
1 चेंडूची पकड बदलल्यामुळे कामगिरी उंचावली -उमेश
2 दादासाठी कायपण ! BCCI संविधानातला महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत
3 तो माझा अहंकार होता ! भारताच्या विश्वचषकातील पराभवावर कोहलीचं मोठं विधान
Just Now!
X