News Flash

दिवसरात्र कसोटी सामना हैदराबाद किंवा राजकोटला

बीसीसीआयने या दौऱ्यातील सामन्यांची कार्यक्रम पत्रिका निश्चित केली आहे.

संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज संघ यंदा भारताच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्याबरोबर होणाऱ्या कसोटी सामन्यांपैकी दिवसरात्र स्वरूपाचा एक सामना हैदराबाद किंवा राजकोट येथे होणार आहे.

बीसीसीआयने या दौऱ्यातील सामन्यांची कार्यक्रम पत्रिका निश्चित केली आहे. मंडळाच्या व्यवस्थापन समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

भारताचा अफगाणिस्तानबरोबर जूनमध्ये कसोटी सामना होणार आहे.  दिवाळीनंतर विंडीजबरोबर दोन कसोटी सामने होणार आहेत. त्याबरोबर मुंबई, गुवाहाटी, कोची, इंदूर व पुणे येथे नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय सामने होणार आहेत. कोलकाता, चेन्नई व कानपूर येथे ट्वेन्टी-२० सामने होतील.

विंडीजच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ दोन महिने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 5:13 am

Web Title: day night test cricket match may host by hyderabad or rajkot
Next Stories
1 सिंधूचे स्वप्न भंगले!
2 तिरंगी वर्चस्वासाठी अंतिम लढाई
3 सोनेरी क्षणांचे वारसदार
Just Now!
X