बाउंसर चेंडू डोक्यावर आदळल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन झाल्याच्या घटनेला काही दिवसही उलटत नाहीत तोच क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने इस्त्रायलमध्ये अंपायरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इस्त्रायलच्‍या अशदोद शहरातील एका सामन्‍यात पंचाचे काम करणा-या ५५ वर्षीय हिलेल ऑस्‍कर यांचा चेंडू लागून मृत्‍यू झाला आहे. मॅच सुरू असताना फलंदाजाने प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला रनआऊट करण्याच्या उद्देशाने स्टम्पच्या दिशेने फेकलेला चेंडू एका यष्टींवर आपटून थेट अंपायर हिलेल ऑस्कर यांना लागला. बॉल इतक्या जोरात लागला की, अंपायर ऑस्कर मैदानातच कोसळले, थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. याआधी पाच वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये वेल्स येथे एका सामन्यादरम्यान फिल्डरने फेकलेला चेंडू चुकून अंपायरलाच लागला आणि त्यांचा मृत्यू झाला होता.