News Flash

IPL 2021 : धवनकडून आयपीएलमध्ये नवे ‘शिखर’ सर!

सध्यातरी धवनचा हा विक्रम मोडणे अशक्यच!

शिखर धवन

आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या खेळीत अनेक विक्रम केले.

यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅप असणाऱ्या धवनने सलामी फलंदाज म्हणून 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. 160व्या डावात धवनने ही कामगिरी केली.

 

शिखर धवन आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा चार संघांकडून खेळला आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात 124 डावात 4692 धावा आहेत. तिसऱ्या स्थानी पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल आहे. त्याने सलामीवीर म्हणून 122 सामन्यात 4480 धावा केल्या आहेत. धवनचा हा रेकॉर्ड मोडणे, सध्यातरी अशक्य आहे.

गेल्या आयपीएलपासून धवन दिल्लीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो आहे. या मोसमातही त्याने चांगली सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 5:54 pm

Web Title: dc batsman shikhar dhawan first to score 5000 runs as opener in ipl adn 96
टॅग : IPL 2021,Shikhar Dhawan
Next Stories
1 IPL 2021 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला भरावे लागणार 12 लाख!
2 ‘‘वीरूभाई माझा पगार वाढवा’’, सेहवागने सांगितला ‘तो’ किस्सा
3 IPL 2021 : हर्षल पटेलकडे पर्पल कॅप कायम
Just Now!
X