27 September 2020

News Flash

लोकेश राहुल भारतीय कसोटी संघात पुनरागमन करेल !

माजी सलामीवीराने व्यक्त केला विश्वास

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूही सध्या घरी बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन वर्षात भारतीय संघाने घरच्या मैदानावर श्रीलंका, ऑस्ट्रेलिया तर परदेशात न्यूझीलंडचा सामना केला. न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी आणि वन-डे मालिकेतली कामगिरी वगळता भारताने चांगली कामगिरी केली आहे. विशेषकरुन लोकेश राहुलने गेल्या काही सामन्यांमध्ये आपला चांगला प्रभाव पाडला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात यष्टीरक्षण आणि मधल्या फळीत फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी लोकेश राहुलने पूर्ण केली.

त्याच्या या कामगिरीनंतर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र निवड समितीने राहुलला संधी दिली नाही. यावर सोशल मीडियात चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरला एका चाहत्याने ट्विटरवर कसोटी संघात राहुलचं पुनरागमन होईल का असा प्रश्न विचारला…ज्याला उत्तर देताना वासिम जाफरने हो असं उत्तर दिलं आहे.

२०१९ हे साल राहुलसाठी खडतर गेलं होतं. कसोटी संघातली खराब कामगिरी लक्षात घेता तत्कालीन निवड समितीने राहुलला विश्रांती देत रोहित शर्माला सलामीला संधी दिली. रोहितनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी करत कसोटी संघात सलामीच्या जागेवर आपला हक्क सांगितला. दरम्यानच्या काळात स्थानिक क्रिकेटमध्ये राहुल चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे कसोटी संघाची दारं राहुलसाठी पुन्हा कधी उघडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 2:35 pm

Web Title: definitely yes kings xi punjab batting coach wasim jaffer confident of kl rahuls test comeback psd 91
Next Stories
1 गौतमचा करोनाविरोधात गंभीर लढा, खासदार निधीतली १ कोटीची रक्कम मदतनिधीला
2 करोनाशी लढा : मराठमोळ्या अजिंक्यचा मुख्यमंत्री सहायता निधीला हातभार
3 करोनाशी लढा : आपण यावरही मात करु, फक्त परिस्थितीचं गांभीर्य ओळखा – लक्ष्मीपती बालाजी
Just Now!
X