News Flash

युवा राष्ट्रकुल स्पर्धा : शंकर, देरू यांना सुवर्णपदक

शंकरने २.१४ मीटर उंच उडी मारून मुलांच्या गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

युवा राष्ट्रकुल स्पध्रेत भारताच्या तेजस्वीन शंकर आणि जमजांग देरू यांनी सुवर्णपदकाची कमाई केली, तर सुप्रिया मोंडलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शंकरने २.१४ मीटर उंच उडी मारून मुलांच्या गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेचा रोशन रणतुंगा आणि जमैकाचा लॅशेन विल्सन यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शंकरने सातत्यपूर्ण कामगिरी करताना राष्ट्रकुल स्पध्रेतही छाप सोडली. तत्पूर्वी, त्याने दोहा येथे झालेल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत कांस्यपदक आणि चीनमध्ये झालेल्या जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच जागतिक युवा अजिंक्यपद स्पध्रेत त्याने आठवे स्थान पटकावले होते.
वेटलिफ्टंगपटू देरूने मुलांच्या ५६ किलो वजनी गटात २३७ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले. तिने स्नॅच प्रकरात १०२ किलो, तर क्लिन प्रकारात १३५ किलो वजन उचलले. जलतरणपटू मोंडलने मुलांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात २ मिनिटे ०१.९४ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. न्यूझीलंडच्या विल्रिच कोएत्झीने (२:०१.८५) सुवर्ण आणि दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेंडन लेव्हीने (२:०२.१९) कांस्यपदक जिंकले.
सेंथिलकुमार उपांत्य फेरीत
बिगरमानांकित भारताच्या स्क्वॉशपटू व्हेलाव्हन सेंथिलकुमार याने राष्ट्रकुल युवा स्पध्रेत पुरुष एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तामिळनाडूच्या सेंथिलकुमारने उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ल्युक जोन्सवर १२-१०, ३-११, ११-६, ११-५ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर अव्वल मानांकित मलेशियाच्या इयेन यॉव जीचे आव्हान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 12:01 am

Web Title: delhi boy tejaswin shankar strikes gold in commonwealth youth games
Next Stories
1 ट्विटरवर सचिन, धोनीपेक्षाही कोहली सरस!
2 धडाकेबाज! फेडरर व मरे यांचा शानदार विजय
3 हॅमिल्टन चालिसा!
Just Now!
X