20 April 2019

News Flash

दिल्लीत धोनी उतरलेल्या हॉटेलमध्ये आग, धोनीसह सर्व खेळाडू सुखरुप

आगीत टीमची किट जळून खाक झाली

दिल्लीतील द्वारका परिसरात वेलकम नावाचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये महेंद्रस सिंह धोनी उतरला होता.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उतरलेल्या हॉटेलमध्ये शुक्रवारी सकाळी आग लागली. महेंद्रसिंह धोनीला हॉटेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिल्लीतील द्वारका परिसरात वेलकम नावाचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये महेंद्रस सिंह धोनी उतरला होता.धोनीसोबत झारखंडची संपूर्ण टीमही याच हॉटेलमध्ये थांबली होती. शुक्रवारी सकाळी साडे सातच्या सुमारास हॉटेलमध्ये आग लागली. आगीत टीमची किट जळून खाक झाली. त्यामुळे मॅच पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दिल्लीतील पालम मैदानात विजय हजारे करंडकातील उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. शुक्रवारपासून हा सामना होणार होता. झारखंड विरुद्ध पश्चिम बंगाल यांच्यात हा सामना होणार होता. मात्र झाारखंडच्या संघाची किट जळून खाक झाल्याने हा सामना शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

विजय हजारे करंडकात महेंद्रसिंह धोनीने झारखंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या धोनीने संघातील खेळाडूंना मार्गदर्शनही केले आहे. विदर्भवर सहा विकेटने मात करत झारखंडने उपांत्य फेरीत धडक दिली होती. महेंद्रसिंह धोनीने षटकार ठोकत त्याच्या संघाला विजय मिळवून दिला होता.

First Published on March 17, 2017 10:05 am

Web Title: delhi fire breaks out at dwarka hotel ms dhoni other jharkhand players evacuated