News Flash

IPL 2021: दिल्लीला पंतची चूक भोवली? १७व्या ओव्हरमध्ये उनाडकटला रनआऊट करण्याची संधी गमावली!

जयदेव-मॉरीस जोडीनं सामना जिंकवला

सौजन्य- iplt20.com

दिल्ली विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात राजस्थानने ३ गडी आणि २ चेंडू राखून बाजी मारली. दिल्लीनं राजस्थानसमोर विजयासाठी १४७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान राजस्थाननं ७ गडी गमवून गाठलं. या विजयासह राजस्थाननं आयपीएलमधला पहिला विजय नोंदवला आहे. दिल्लीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या ऋषभ पंतच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीला बसला. जयदेव दूसरी धाव घेताना फसला होता. मात्र ही संधी ऋषभच्या हातून गेली आणि सामना तिथेच फिरला.

कर्णधार ऋषभ पंतनं १७ वं षटक टॉम करनच्या हाती सोपवलं होतं. त्यावेळी राजस्थानचे ७ गडी बाद झाले होते. तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याची संधी दिल्लीच्या गोलंदाजांकडे होती. मात्र ऋषभ पंतची चूक भोवली आणि दिल्लीला पहिल्या पराभवला सामोरं जावं लागलं. करनच्या पहिल्या चेंडूवर मॉरिसनं मिड विकेटवर फटका मारला आणि एक धाव घेतली. मात्र जयदेवनं त्याला स्ट्राईक देण्यासाठी पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मॉरिसनं त्याला माघारी धाडलं आणि आता जयदेव बाद होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. मात्र ऋषभच्या हातून चेंडू निसटला आणि जयदेवला जीवदान मिळालं.

RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल

या सामन्यात मॉरिसनं नाबाद ३६ तर जयदेव उनडकटनं नाबाद ११ धावा केल्या. या सामन्यात जयदेवनं गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. जयदेवनं ४ षटकात १५ धावा देत ३ गडी बाद केले होते.

RR vs DC : अप्रतिम पराग! भन्नाट थ्रोवर दिल्लीच्या कर्णधारालाच धाडलं मघारी!

राजस्थानच्या विजयानंतर दिल्लीची गुणतालिकेत घसरण झाली आहे. दिल्ली दूसऱ्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तर मुंबईची दूसऱ्या स्थानी वर्णी लागली आहे. तर राजस्थान रॉयल्स पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 11:35 pm

Web Title: delhi lose match against rajasthan due to miss field by rishabh pant rmt 84
Next Stories
1 RR vs DC : ख्रिस मॉरिसची शेवटच्या षटकांत फटकेबाजी; चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा विजय!
2 RR vs DC : अप्रतिम पराग! भन्नाट थ्रोवर दिल्लीच्या कर्णधारालाच धाडलं मघारी!
3 विराट कोहलीचा संघ IPL गुणतालिकेत अव्वल; नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट मीम्स
Just Now!
X