News Flash

श्रीशांत, अंकितचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस.श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून आज मंगळवार न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

| July 31, 2013 04:59 am

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस.श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून आज मंगळवार न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिस (विशेष पथक) एस.एन.श्रीनिवासन म्हणाले, या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याने श्रीशांत आणि अंकितचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. १० जून रोजी न्यायालयाने या दोघांचा जामीन मंजूर केला होता. सध्याच्या उपलब्ध पुराव्यांना अनुसरून या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाईही करता येण्यासारखी नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
श्रीशांत सध्या जामीनावर कारागृहाबाहेर असून, तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, दिल्ली पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केल्याने श्रीशांत आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी पुढे गेली आहे. या दोन खेळाडूंवर मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल इतके सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2013 4:59 am

Web Title: delhi police to seek cancellation of bail to sreesanth chavan
टॅग : Sreesanth
Next Stories
1 न्यायालयाच्या निर्णयावर श्रीनिवासन यांची चुप्पी
2 विश्वचषक २०१५: आयसीसी ठेवणार सट्टेबाजांवर करडी नजर; पोलिसांबरोबर मदतीचा करार
3 दक्षिण आशियाई १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा : भारत अजिंक्य
Just Now!
X