दिल्ली व्हेवरायडर्स संघाने पंजाब वॉरियर्सवर ३-० अशी मात करीत हॉकी इंडिया लीगमध्ये आघाडीस्थान कायम राखले. प्रारंभापासूनच आक्रमण खेळ करणाऱ्या दिल्लीने १४ व्या मिनिटाला गोल करीत पंजाबवर दडपण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा गोल १४ व्या मिनिटाला आकाशदीपसिंग याने प्रतिस्पर्धी संघातील चारपाच खेळाडूंना चकवित नोंदविला. मध्यंतरापर्यंत दिल्लीने १-० अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या ५० व्या मिनिटाला अँड्रय़ु हेवर्ड याने दिल्लीस २-० असे अधिक्य मिळवून दिले. या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळताना त्याने हा गोल करीत दिमाखदार सुरुवात केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2013 10:04 am