News Flash

आयपीएलच्या धर्तीवर इतर खेळांचा भाग्योदय कधी?

यंदाच्या पाचव्या पर्वात नागपुरातील ३ कबड्डीपटूंची प्रो-कबड्डीसाठी निवड झाली.

आयपीएलच्या धर्तीवर इतर खेळांचा भाग्योदय कधी?
तळागाळातील कबड्डीपटूंना नावाजलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.

पारंपरिक क्रीडा प्रकार नव्या पद्धतीने सादर केले जात असल्याने अलीकडे भारतात क्रीडा क्षेत्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रेक्षकांनीही हा बदल स्वीकारला असून त्याला उदंड प्रतिसादही मिळत आहे. क्रिकेट आयपीएल, प्रो-कबड्डी आणि  अल्टिमेट टेबल टेनिसप्रमाणेच खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल आदीं खेळांचाही भाग्योदय अपेक्षित असून यासाठी कोण पुढाकार घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

क्रिकेटवेडय़ा भारतात ‘आयपीएल’ने या खेळाचे रूपच पालटले आहे. यामुळे अनेक खेळाडूंना संधीही मिळाली. त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळता आले. त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले. ‘आयपीएल’ला मिळालेले यश पाहून याच धर्तीवर पारंपरिक खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कबड्डीने देखील कात टाकली. अस्सल मातीवर खेळविल्या जाणारी कबड्डी अचानक मॅटवर गेली अन् प्रो-कबड्डी म्हणून नावारूपाला आली. सामन्यांसाठी मोठे प्रायोजक मिळाल्याने ही स्पर्धा क्रिकेटप्रमाणेच घराघरात पोहोचली.

तळागाळातील कबड्डीपटूंना नावाजलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.

यंदाच्या पाचव्या पर्वात नागपुरातील ३ कबड्डीपटूंची प्रो-कबड्डीसाठी निवड झाली. नुकतेच टेबल टेनिसमध्ये अल्टिमेट टेबल टेनिस सामने सुरू झाले. त्यामुळे नवोदित टेबल टेनिसपटूंना चांगले दिवस आले. वरील क्रीडा प्रकाराप्रमाणेच खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कॅरम, बॅडिमटनसह इतरही खेळ स्पर्धा व्हाव्यात अशी क्रीडारसिकांची अपेक्षा आहे. कबड्डीप्रमाणेच खो-खो हा सुद्धा शहरी आणि ग्रामीण भागात लोक प्रिय आहे. आयपीएलच्या धर्तीवर याचेही सामने झाल्यास या खेळाचा विकास होईल.

लवकरच आयव्हीएल सुरू होणार

व्हॉलीबॉलला नव्या स्वरूपात म्हणजे इंडियन व्हॉलीबॉल लीगसाठी आम्ही व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडे प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी त्याला मंजुरी देऊन तब्बल १२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, कोणत्या कंपनीसोबत आयव्हीएलचा करार करायचा यावरून अध्यक्ष आणि सचिवांमध्ये वाद झाल्याने आयव्हीएल थंडय़ाबस्त्यात गेले. मात्र, पुढील पाच महिन्यात आम्ही आयव्हीएल सुरू करणार आहोत.

सुनील हांडे, सहसचिव, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 1:01 am

Web Title: demand for ipl style league for other traditional sports
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅटट्रीक
2 Pro Kabaddi Season 5 – गुजरात ठरले दबंग, दिल्लीचा पराभव
3 श्रीलंकेच्या अडचणींमध्ये वाढ, आणखी एक खेळाडू संघाबाहेर
Just Now!
X