महिला विभागात देना बँकेची हॅट्ट्रिक
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय औद्योगिक कबड्डी स्पध्रेच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागांत मिहद्रा अँड मिहद्राने वर्चस्व प्रस्थापित केले, तर महिलांमध्ये देना बँकेने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साकारली.
पुरुष शहरी विभागात मिहद्राने सेंट्रल बँक ऑफ इंडियाविरुद्ध पहिल्या डावात ९-५ अशी आघाडी घेतली. आनंद पाटील आणि अभिषेक भोजने यांच्या चढाई आणि चतुराज कोरवी, स्वप्निल िशदे यांच्या पकड या बळावर मिहद्राने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या डावात सेंट्रल बँकेच्या परेश म्हात्रे आणि अर्जुन िशदे यांनी खोलवर चढाईचा पुरेपूर प्रयत्न केला. पण मिहद्राने सावधपणे खेळत सामना १५-११ असा जिंकला.
पुरुष ग्रामीण विभागात नागपूरच्या मिहद्रा संघाने यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना (सातारा) संघाला ३७-१० अशी धूळ चारली. मिहद्राच्या जोरदार हल्ल्यामुळे साताऱ्याच्या संघाचा आत्मविश्वास डळमळला. महेश पवार आणि आकाश पाटील यांनी पराभव टाळण्यासाठी झुंज दिली; परंतु मिहद्राच्या आकाश पिकलमुंडे, योगेश पारिसे यांच्या चढाया आणि सुमित डेवरे, अकिंत कडू, पवन पाठक यांच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
महिला खुल्या विभागात देना बँक पहिल्या डावात मुंबई महिला पोलीस जिमखान्यावर ८-५ अशी आघाडी घेतली. अपेक्षा टाकळे आणि पल्लवी पोटे यांनी उत्कृष्ट चढाया केल्या, तर रेखा सावंतने अचूक पकडी केल्या. पोलिसांच्या भक्ती इंदुलकर, शिरीशा शेलार यांच्या चढाया आणि आरती नार्वेकरच्या पकडी यामुळे देना बँकेला दुसऱ्या डावात झगडावे लागले; परंतु देना बँकेने सामना १२-१० असा जिंकला.
पुरुषांच्या शहरी विभागात ओमकार जाधव (मिहद्रा) सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला. सेंट्रल बँकेचा परेश म्हात्रे सर्वोत्तम चढाईपटू तर सुनील सिद्धगवळी सर्वोत्तम पकडपटू ठरला. ग्रामीण विभागात महिंद्राचे आकाश पिकलमुंडे व अंतिक कडू अनुक्रमे सर्वोत्तम अष्टपलू व पकडपटू ठरले. महिलांमध्ये देना बँकेची अपेक्षा टाकळे व मंगल माने अनुक्रमे सर्वोत्तम अष्टपैलू व पकडपटू ठरल्या. पोलिसांची शिरीशा शेलार सर्वोत्तम चढाईपटू ठरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 3:34 am