04 December 2020

News Flash

Denmark Open Badminton : ‘फुलराणी’ची सुसाट घौडदौड, जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात

सायनाचा सामन्यात आक्रमक खेळ

सायना नेहवाल

भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने जपानच्या नोझुमी ओकुहाराला १७-२१, २१-१६, २१-१२ अशा ३ सरळ सेट्समध्ये पराभव केला. ५८ मिनीटं चाललेल्या सामन्यात सायनाने आपला सर्व अनुभव पणाला लावत ओकुहाराची झुंज मोडून काढली. याआधी उपांत्यपूर्व सामन्यात सायनाने जपानच्याच अकाने यामागुचीला पराभूत केलं होतं.

अवश्य वाचा – Denmark Open Badminton : किदम्बी श्रीकांतची अनुभवी लिन डॅनवर मात, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सलामीच्या सेटमध्ये ओकुहाराने आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती, काही कालावधीनंतर सायना नेहवालने ओकुहाराला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ओकुहाराने आपली आघाडी कायम ठेवली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ओकुहाराने आपल्याकडे ११-६ अशी ५ गुणांची आघाडी कायम ठेवली. मध्यांतरानंतर ओकुहाराने काही झटपट गूण मिळवले, सायनानेही यादरम्यान काही चांगले फटके खेळत आपलं अस्तित्व दाखवून दिलं. मात्र ओकुहाराने १७-२१ च्या फरकाने पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्येही सायना नेहवालने केलेल्या आक्रमक सुरुवातीवर ओकुहाराने पाणी फिरवत सामन्यात आघाडी घेतली. मात्र मध्यांतराच्या दरम्यान ओकुहाराने केलेल्या क्षुल्लक चुकांचा फायदा घेत सायनाने सामन्यात पुनरागमन केलं. यानंतर मध्यांतरानंतर सायनाने आक्रमक फटके खेळत ओकुहाराला कोर्टच्या दोन्ही दिशांना पळवलं, ज्यामुळे ओकुहारा काहीशी दमलेली पहायला मिळाली. अखेर २१-१६ च्या फरकाने सायनाने सेट जिंकत सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं.

तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडू बरोबरीत खेळत होत्या. मात्र सायनाने संधी हेरुन ओकुहारावर दबाव टाकण्यास सुरुवात करत सामन्यात आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये ओकुहारा सायनाचा सामना करु शकली नाही, ज्यामुळे मध्यांतरापर्यंत एकतर्फी खेळात सायनाने ११-३ अशी मोठी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर ओकुहाराने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे हे प्रयत्न सायनाने हाणून पाडत २१-१२ च्या फरकाने सेट जिंकत सामन्यामध्येही बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2018 10:11 am

Web Title: denmark open badminton 2018 saina nehwal beat japan nozumi okuhara and enter in semi final
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 महाराष्ट्र कुस्ती दंगल : स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, नागराज मंजुळे संघमालक
2 दिल्लीची हॅट्ट्रिक मुंबई रोखणार?
3 भारताची पाकिस्तानशी आज महालढत
Just Now!
X