22 October 2020

News Flash

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य दुसऱ्या फेरीत

१९ वर्षीय लक्ष्यने ख्रिस्तो पोपोवला २१-९, २१-१५ असे पराभूत केले.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताच्या लक्ष्य सेनने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १९ वर्षीय लक्ष्यने ख्रिस्तो पोपोवला २१-९, २१-१५ असे पराभूत केले.

डेन्मार्क स्पर्धेद्वारे करोना साथीच्या काळात सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला सुरुवात झाली आहे. पोपोवविरुद्ध पहिल्या गेममध्ये ११-८ या आघाडीतून लक्ष्यने सुरुवातीपासून नियंत्रण ठेवले होते. दुसऱ्या गेममध्ये १२-१२ अशी चुरस होती. मात्र लक्ष्यने त्यातून १५-१२ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला.

‘‘स्पर्धेत चांगली सुरुवात करता आली. दुसऱ्या गेममध्ये माझ्या काही चुका झाल्याने पोपोवला आघाडी घेता आली होती. मात्र त्यातून सावरता आले. सात महिन्यानंतर स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळता आल्याचा आनंद आहे,’’ असे जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने सांगितले. लक्ष्यने गेल्या वर्षी पाच विजेतेपदे पटकावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:19 am

Web Title: denmark open badminton tournament lakshya enters the second round abn 97
Next Stories
1 Coronavirus: धक्कादायक! क्रिस्टियानो रोनाल्डो Covid-19 पॉझिटिव्ह
2 भारताचे माजी फुटबॉलपटू कार्लटन चॅपमन यांचे निधन
3 फ्रेंच विजेतेपदाची यंदा खात्री नव्हती -नदाल
Just Now!
X