22 October 2020

News Flash

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत; लक्ष्य पराभूत

दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या जेसन हो-शू याला २१-१५, २१-१४ असे सहज नमवले.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताच्या किदम्बी श्रीकांतने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या जेसन हो-शू याला २१-१५, २१-१४ असे सहज नमवले. परंतु भारताच्या लक्ष्य सेनला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

जेसनविरुद्धच्या लढतीत दोन्ही गेममध्ये दोघांनी ११ गुण घेतल्याने चुरस होती. मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्रीकांतने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये तर श्रीकांतला १९-११ अशी दणदणीत आघाडी घेता आली. त्यावेळेस आठ मॅचपॉइंट हातात असतानाही श्रीकांतने वेळ न दवडता जेसनच्या चुकांचा फायदा घेतला. श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित चाओ चेनशी लढत होण्याची शक्यता आहे.

लक्ष्यला डेन्मार्कच्या हॅन्स विटींघुसकडून २१-१५, ७-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकून लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. मात्र दुसरा गेम त्याने गमावला. लक्ष्यने तिसऱ्या गेममध्ये थोडीफार चुरस दिली. मात्र त्याला पराभव टाळता आला नाही.

स्पर्धेत चांगल्या कामगिरीत सातत्य टिकवता आल्याचे समाधान आहे. माझी उपांत्यपूर्व फेरीत चाओ चेनविरुद्ध लढत होऊ शकते. चाओविरुद्ध खेळणे निश्चित सोपे नाही. तो ताकदीचे फटके खेळतो. आक्रमक कधी खेळायचे आणि बचाव कसा करायचा याचे चाओला चांगले ज्ञान आहे.

-किदम्बी श्रीकांत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:19 am

Web Title: denmark open badminton tournament srikanth in the semifinals abn 97
Next Stories
1 नेशन्स लीग फुटबॉल : फ्रान्सच्या एम्बाप्पेची चमक
2 शिवाजी पार्क ते ‘आयपीएल’
3 गुगलचा नवा गोंधळ! आता म्हणे.. सारा तेंडुलकर शुभमन गिलची बायको
Just Now!
X