वॉर्नर, लॅबूशेन यांची अर्धशतके

लीड्स : पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा बराच वेळ वाया गेला. परंतु जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची ५ बाद १४५ अशी केविलवाणी अवस्था केली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (६१) आणि मार्नस लॅबूशेन (५१*) यांनी अर्धशतके झळकावली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मग वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मार्क हॅरिस (८) बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मग नवव्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने उस्मान ख्वाजाला (८) तंबूची वाट दाखवली. हे दोन्ही झेल यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने घेतले. मग वॉर्नर आणि लॅबूशेन यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १११ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. आर्चरनेच वॉर्नरला बाद करण्यात यश मिळवले. मग ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू वेड भोपळासुद्धा फोडण्यात अपयशी ठरले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १४.५ षटकांत २ बाद ३९ (डेव्हिड वॉर्नर ६१, मार्नस लॅबूशेन ५१*; जोफ्रा आर्चर ३/४०, स्टुअर्ट ब्रॉड २/२६)