18 January 2021

News Flash

कूल धोनीचा झिवासोबत डान्स; पाहा ‘माही’चा हटके अंदाज

पाहा व्हिडीओ

आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी रांचीमध्ये आहे. पण दुबईतील त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे. कॅप्टन कूल धोनीचा या व्हिडीओमधील अंदाज नेटकऱ्यांना आवडला आहे.

चेन्नईनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ एका पार्टीमधील असल्याचं दिसतेय. या व्हिडीओमध्ये धोनी लेक झिवा आणि पत्नी साक्षीसोबत थिरकताना दिसत आहे. याआधी धोनी डान्स करताना कधीच दिसला नव्हता. धोनीचा हा हटके अंदाजावर चाहते फिदा झाले आहे.

चेन्नई संघानं व्हिडीओ पोस्ट करताना आकर्षक असं कॅप्शनही दिलं आहे. “तुम्ही हा व्हिडीओ पाहताना चेहऱ्यावरचं हास्य थांबवू शकता का? अजिबात नाही.” असं भन्नाट कॅप्शन या व्हिडीओला चेन्नईनं दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 5:10 pm

Web Title: dhoni danced with sakshi and ziva video nck 90
Next Stories
1 संकटमोचक पांड्या! तुफानी फलंदाजी करत रचला इतिहास
2 कसोटी मालिकेत रोहितला खेळता यावं यासाठी BCCI चा विशेष प्लान
3 कांगारुंनी धू-धू धुतलं; चहलच्या नावावर नकोसा विक्रम
Just Now!
X