एकदिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असता तर फलंदाजीतील सर्व विक्रम त्याने त्याच्या नावावर केले असते, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हटले आहे.

धावांचे लक्ष्य गाठण्यात धोनी किंवा विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम कोण, या प्रश्नावर गंभीर म्हणाला की, ‘‘धोनी आणि कोहली यांच्यात तुलना करणे अवघड आहे. कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो याउलट धोनी सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजीला येतो. श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या सध्याच्या संघांची गोलंदाजी पाहता धोनीने निश्चित मोठी फटकेबाजी केली असती आणि सर्व विक्रम त्याच्या नावावर केले असते,’’ याकडे गंभीरने लक्ष वेधले.

जडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक -स्मिथ

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, असे कौतुकोद्गार ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने काढले. युवा खेळाडूंमध्ये लोकेश राहुल हा सर्वात प्रभावी खेळाडू आहे, असेदेखील स्थिमने म्हटले.