सामना जिंकून देण्याबाबत महेंद्रसिंह धोनी हाच श्रेष्ठ खेळाडू आहे. मी अजूनही विद्यार्थीच आहे, असे भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने सांगितले. नुकत्याच झालेल्या निदाहास ट्वेन्टी-२० स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.

कार्तिकने सांगितले, ‘‘धोनीशी माझी तुलना करणे अयोग्य होईल. त्याने माझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिले आहेत. माझ्यापेक्षा तो कितीतरी महान खेळाडू आहे. तो सर्व युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे. तो नेहमी संघातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो व प्रोत्साहनही देत असतो. त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच समजतो.’’

‘‘नेहमी सकारात्मक वृत्तीनेच मी खेळत आलो आहे. आजपर्यंत केलेल्या पुण्याईमुळेच माझ्याकडून विजयी षटकार खेचला गेला.   विजयाचा आनंद शब्दांत सांगणे अशक्य आहे. मुंबईच्या अभिषेक नायरकडून मला खूप मौलिक सूचना मिळाल्या आहेत. त्याचा शतश: ऋणी आहे. आक्रमक खेळताना कसे खेळावे याचे नियोजन मी त्याच्याकडून शिकलो,’’ असे कार्तिक म्हणाला.

( दिनेश कार्तिक))