भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच सामना सहा गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद शतकाबरोबरच धोनीच्या खास ग्लोजचीही चांगलीच चर्चा झाली. मात्र धोनीने या सामन्यात वापरलेले पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह असणारे ग्लोज वापरू नयेत असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत. मात्र ‘बलिदान’ असा संदेश देणारे चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज धोनीने पुढील सामन्यातही वापरावेत अशी गळ नेटकऱ्यांनी धोनीला घातली आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग असून हा हॅशटॅग वापरून अनेकांनी धोनीच्या या कृतीचे समर्थन केले आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच धोनीने आयसीसीच्या नाकावर टिच्चून पुढील सामन्यामध्येही हे सन्मानचिन्ह असणारे ग्लोव्ह्ज वापरावेत असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

आयसीसीचा काय संबंध

धोनीच्या ग्लोजपेक्षा पंचगीरीवर लक्ष द्या

क्रिकेट बघणे सोडेल

बीसीसीआयने आयसीसीचे ऐकले तर…

ते चालतं पण हे नाही

तो निर्णय त्याचा

नक्की वाचा >> ‘ICC ला पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो पण धोनीने वापरलेले बलिदान चिन्ह नाही’

नमाज चालतो ग्लोज नाही

..कारण आयसीसी धोनी ग्लोव्ह्ज प्रकरणात व्यस्त

तो ठरेल क्रिकेट इतिहासातील काळा दिवस

आयसीसीची प्राथमिकता

चुकीचे निर्णय हा आयसीसीचा प्रश्न नाही पण…

धोनीने असं करावं

जाहिरातदारांच्या लोगोवर पण आक्षेप घ्या

तंबाखू, दारु चालते पण देशभक्ती नाही

#DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग होता तर याच प्रकरणासंदर्भातील #BalidaanBadge हा भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड करत होता.

धोनीचे भारतीय लष्कराबद्दल असणारे प्रेम सर्वश्रूत आहे. अनेकदा तो आपल्या कृतीमध्ये भारतीय लष्कराबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतो. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेला जाण्याआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील शेवटच्या सामन्यामध्ये सर्व भारतीय खेळाडूंनी विशेष आर्मी कॅप्स घातल्या होत्या. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय संघाने या विशेष कॅप्स घातल्या होत्या. या प्रकरणावरुन पाकिस्तानने आक्षेप घेत यासंदर्भात आयसीसीने बीसीसीआयवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र या कॅप्स वापरण्यासाठी बीसीसीआयने आधीच आयसीसीची परवाणगी घेतल्याने पाकिस्तानने केलेली मागणी आयसीसीने फेटाळून लावली होती.