* भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना
* पाकिस्तानसमोर भारताचे २२८ धावांचे आव्हान
भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या ३० धावांवर निम्मा संघ तंबूत परतला असता. सुरेश रैना बरोबर ७८ धावांची भागीदारी करत धोनीने भारताचा डाव सावरण्यास सुरूवात केली. सुरेश रैना आपल्या व्ययक्तीक ४३ धावांवर बाद झाला असता, धोनीने आपली झुंजार खेळी सुरू ठेवत आर.अश्विच्या साथीने भारतीय संघाला ५० षटकांत २२८ धावांपर्यंत मजल मारता आली. महेंद्रसिंग धोनीने नाबाद ११३ धावांची कप्तानी खेळी केली यात ३ षटकार, ७ चौकारांचा समावेश आहे. रैनाने ४३ धावांची, तर अश्विनने नाबाद ३१ धावांची खेळी केली
जुनैद खानने सेहवाग, कोहली आणि युवराजसिंग यांचा, तर इरफानने गंभीरचा चक्क त्रिफळा उडवला. मग जुनैदनेचं रोहित शर्माला तिस-या स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडलं. त्यामुळे पॉवरप्लेच्या पहिल्या दहा षटकांतचं भारताची पाच बाद २९ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. आता पाकिस्तान समोर २२८ धावांचे आव्हान भारताने ठेवले आहे.