03 June 2020

News Flash

आयसीसीच्या चॅम्पियन्स संघाचे नेतृत्व धोनीकडे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले आहे. धोनीबरोबरच या संघामध्ये स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या शिखर धवनसह एकूण

| June 25, 2013 01:05 am

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले आहे. धोनीबरोबरच या संघामध्ये स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या शिखर धवनसह एकूण पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे, तर उपविजेते ठरलेल्या इंग्लंडच्या संघातील दोन खेळाडू या संघात आहेत. यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीने या संघात समावेश केला आहे.
आयसीसीचा चॅम्पियन्स करंडक संघ : शिखर धवन (भारत), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड), कुमार संगकारा (श्रीलंका), विराट कोहली (भारत), मिसबाह-उल-हक (पाकिस्तान), महेंद्रसिंग धोनी (भारत), रवींद्र जडेजा (भारत), रयान मॅकलारेन (दक्षिण आफ्रिका), भुवनेश्वर कुमार (भारत), जेम्स अँडरसन (इंग्लंड), मिचेल मॅक्लेनघान (न्यूझीलंड) आणि जो रूट (इंग्लंड).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2013 1:05 am

Web Title: dhoni named captain of icc team of the champions trophy
Next Stories
1 ‘जो दबावामध्ये उत्तम खेळी करतो, तोच उत्कृष्ट खेळाडू’- महेंद्रसिंग धोनी
2 श्रीनिवासन १२ व्यांदा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद
3 तिरंगी स्पर्धेसाठी विंडीज संघातून सरवानला डच्चू
Just Now!
X