News Flash

धोनीचा भारतरत्न सचिनला सलाम

सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू पुन्हा होणे नाही असे म्हणत सचिन देशाच्या युवा खेळाडूंच्या नेहमी आदर्श स्थानी राहील असे धोनीने म्हटले. अशा विक्रमादित्य खेळाडूला भारतरत्न

| February 5, 2014 03:32 am

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊन क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असल्याचे म्हटले आणि सचिनला मानाचा मुजरा केला.
सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू पुन्हा होणे नाही असे म्हणत सचिन देशाच्या युवा खेळाडूंच्या नेहमी आदर्श स्थानी राहील असे धोनीने म्हटले. अशा विक्रमादित्य खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला असल्याचेही धोनी म्हणाला.
एखाद्या खेळाडूला पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळला ही अतिशय आनंदादायी गोष्ट आहे. देशाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला मिळणारा हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि तो योग्य व्यक्तीला मिळाला आहे. सचिन भारतरत्न पुरस्काराचा हक्काचा मानकरी आहे. असेही धोनी पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 3:32 am

Web Title: dhoni pays tribute to sachin tendulkar
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत- परवेझ रसूल
2 भारतासाठी माझी फलंदाजी सुरूच राहील- सचिन
3 हरभजनला अजूनही पुनरागमनाची संधी?
Just Now!
X