News Flash

धोनीकडून भारतीय संघाचे कौतुक

कसोटी मालिकेतील पराभवामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणांवर टीका झाली, पण इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून धोनीने भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार असल्याचे सिद्ध करून दाखवले.

| September 4, 2014 05:23 am

कसोटी मालिकेतील पराभवामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणांवर टीका झाली, पण इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून धोनीने भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार असल्याचे सिद्ध करून दाखवले. कसोटी मालिकेतील पराभवामुळे पसरलेले धुके आता ओसरले आहे, अशा शब्दांत धोनीने मालिका विजयाचे कौतुक केले. ‘‘जेव्हा मी भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले, त्या वेळचा संघ अप्रतिम होता. आताचा संघही अप्रतिम आहे. कारकिर्दीत चढउतार येतच राहतात. ज्यांच्याबरोबर मला खेळण्याची संधी मिळाली, त्यांचा मी आभारी आहे. त्यांच्या योगदानाशिवाय भारतीय संघाचे यश अशक्य होते,’’ असे धोनीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 5:23 am

Web Title: dhoni praises team india
टॅग : Dhoni,Team India
Next Stories
1 मुस्लिम धर्म स्वीकार, स्वर्ग मिळेल! पाक क्रिकेटपटूचा श्रीलंकेच्या दिलशानला सल्ला
2 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविच, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत
3 सायना व गोपीचंद यांच्यात मतभेद
Just Now!
X