भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्टला संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच धोनीचा सहकारी सुरेश रैना यानेही निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. धोनीने २०१९मध्ये विश्वचषकात आपला शेवटचा सामना खेळला होता. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना आणि २०१५ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याचबाबत रैनाने नुकतेच दैनिक जागरणशी बोलताना भावना व्यक्त केल्या.

पार्थ पवार यांची धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

“चेन्नईला पोहोचताच धोनी निवृत्तीची घोषणा करणार याची मला कल्पना होतीच. त्यामुळे मी सुद्धा तयारीतच होतो. मी, पियुष चावला, दीपक चहर आणि करण शर्मा आम्ही १४ ऑगस्टला रांचीला पोहोचलो. तिथे धोनी आणि मोनू सिंह हे दोघे आमच्योसोबत चार्टर्ड विमानात बसले आणि आणि आम्ही चेन्नईला रवाना झालो. मी, पियुष, अंबाती रायडू, केदार जाधव आणि करण शर्मा आम्ही सारे धोनीसोबत एकत्र बसलो होतो. आमच्या कारकिर्दीबाबत आणि वैयक्तिक जीवनाबाबत चर्चा करत होतो. तेव्हाच आम्ही निवृत्तीची घोषणा केली. त्या घोषणेनंतर आम्ही एकमेकांना अक्षरश: मिठी मारून ढसाढसा रडलो. पण नंतर मात्र आम्ही भावनांना आवर घातला आणि रात्री पार्टीदेखील केली”, असं त्याने सांगितलं.

“आधी निवृत्तीची घोषणा, मग BCCIशी संपर्क”

“आम्ही दोघांनी आधीपासूनच शनिवारी निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं. धोनीचा जर्सी क्रमांक ७ आहे आणि माझ्या जर्सीचा क्रमांक ३ आहे. दोन्ही मिळून ७३ होतात. शनिवारी भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली”, असेही रैनाने सांगितले.