आम्ही मैदानात खेळत असताना भारतीय क्रिकेट चाहते नेहमीच आम्हाला प्रोत्सहीत करत असल्याचे सांगत अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये देखील क्रिकेट बद्दल तुफान वेड असल्याचे भारतीय टी- २० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे. अमेरिकेतील भारतीय क्रिकेट चाहते टिव्हीवर क्रिकेटचा आनंद घेत असताना तात्रिंक अडचणीमुळे क्रिकेट पाहण्यात व्यत्यय निर्माण होऊ नये. यासाठी कशापद्धतीने काळजी घेतात याचा किस्सा धोनीने सांगितला. धोनीने जेंव्हा अमेरिकेतील आपल्या मित्राला एका घरावर तीन-तीन डीश कशासाठी बसवले आहेत, अशी विचारणा केली.त्यावेळी बॅकअपसाठी लोकांनी दोन डीश बसविण्यात आल्याचे धोनीला सांगण्यात आले. हा किस्सा अमेरिकेतील भारतीयांना देखील क्रिकेटचे वेड असल्याचे सिद्ध करतो, असे धोनीने म्हटले आहे. त्यामुळे आतापर्यंत टीव्हीवर क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या अमेरिकेतील भारतीय रहिवाशांसाठी प्रत्यक्षात क्रिकेट पाहण्याची संधी या दोन सामन्याच्या मालिकेतून मिळेल असे धोनी म्हणाला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातीला पहिला टी-२० सामना अमेरिकेतील फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर रंगणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर खेळणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यास एमआरएफ टायर्स आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीमधील संघांच्या यादीतील दुसरे स्थान त्यांना गमवावे लागणार आहे. भारतीय संघाच्या कामगिरीची उत्सुकता चाहत्यांना असल्यामुळे प्रत्येक सामन्याला सरासरी १५ हजार क्रिकेट रसिक हजेरी लावण्याची शक्यता आहे.